पोस्ट्स

वाशिम शहरात 'अकोला नाका चौक' या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढपुतळ्याचे भूमिपूजन.

इमेज
वाशिम शहरात साकारतोय छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा ! आज नवीन शासकीय विश्राम भवनात सर्वपक्षीय नेते, सामजिक संघटना पदाधिकारी सर्व धर्मीय शिवप्रेमींची  बैठक संपन्न सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या पाठपुराव्याचे फलित म्हणून वाशिम शहरात 'अकोला नाका चौक' या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढपुतळ्याचे भूमिपूजन मंगळवार दिनांक 23 जानेवारी 2024 रोजी  मा. खासदार भावनाताई गवळी यांच्या हस्ते संपन्न होत आहे तरी सर्व वाशिम जिल्हा शिवप्रेमींनी या भूमिपूजन सोहळ्यास उपस्थित राहावे ही विनंती... ठिकाण:- अकोला नाका वाशिम वेळ:- दुपारी 1: 00वाजता  नारायणराव काळबांडे जिल्हाध्यक्ष  मराठा सेवा संघ वाशिम

फूड व्यवसाय सुरू करण्यासाठी फूड लायसन्स हा एक महत्त्वाचा घटक आहे. फूड लायसन्स घेतल्यास ग्राहकांच्या आरोग्याचे रक्षण होते आणि फूड व्यवसायाच्या वाढीला चालना मिळते.

इमेज
फूड व्यवसाय हा एक लोकप्रिय व्यवसाय आहे. अनेक लोक फूड व्यवसाय सुरू करून स्वतःचे रोजगार निर्माण करतात. फूड व्यवसाय सुरू करण्यासाठी अनेक गोष्टींची आवश्यकता असते. फूड लायसन्स म्हणजे काय? फूड लायसन्स हा एक प्रकारचा परवाना आहे जो फूड व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक आहे. हा परवाना फूड व्यवसायाच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी दिला जातो. फूड लायसन्स घेतल्यास ग्राहकांना खात्री असते की ते खात असलेल्या अन्नपदार्थांची निर्मिती आणि विक्री योग्य पद्धतीने केली जात आहे. फूड लायसन्सची गरज का आहे? फूड लायसन्सची गरज खालील कारणांसाठी आहे: 1) ग्राहकांच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी:  फूड लायसन्समुळे फूड व्यवसायाच्या सुरक्षिततेची खात्री होते. यामुळे ग्राहकांना खात्री असते की ते खात असलेल्या अन्नपदार्थांमध्ये कोणतेही हानिकारक घटक नाहीत. 2) अन्नपदार्थांच्या गुणवत्तेचे नियंत्रण करण्यासाठी:  फूड लायसन्समुळे अन्नपदार्थांच्या गुणवत्तेचे नियंत्रण होते. यामुळे ग्राहकांना खात्री असते की ते खात असलेल्या अन्नपदार्थांची चव आणि गुणवत्ता चांगली आहे. 3) फूड व्यवसायाच्या वाढीला चालना देण्यासाठी:  फूड लायसन्समु

संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास मंडळाची कर्ज योजना.

इमेज
संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास मंडळाची कर्ज योजना लाभ घेण्याचे आवाहन वाशिम,दि.२८(जिमाका)  संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळामार्फत अनुसूचित जाती प्रवर्गात येणाऱ्या चर्मकार समाजातील चांभार,ढोर,होलार व मोची यांच्याकरीता आर्थिक,शैक्षणिक व सामाजिक विकासासाठी विविध कर्ज योजना राबविल्या जातात.             सन २०२३-२४ या आर्थिक वर्षाकरीता राज्य शासनाच्या व केंद्र शासनाच्या एनएसएफडीसी योजना राबविण्यात येत आहे. ४ हजार ८०० लाभार्थ्यांना कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.            एनएसएफडीसी,नवी दिल्ली यांच्या मुदती कर्ज योजनेअंतर्गत स्मॉल बिझनेससाठी १ लक्ष ते २ लक्ष रुपयापर्यंत,चर्मोद्योगासाठी २ लक्ष रुपये आणि लघुऋण वित्त योजना व महिला समृध्दी योजनेसाठी प्रत्येकी ५० हजार रुपये आहे. या योजनांसाठी मागील प्रलंबित नस्तीकरीता २२ कोटी २१ लक्ष रुपये निधी प्राप्त झाला आहे.            सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात एनएसएफडीसीच्या मुदती कर्ज योजनेअंतर्गत स्मॉल बिझनेससाठी ५ लक्ष रुपये, लघुऋण वित्त योजना व महिला समृद्धी योजनेसाठी प्रत्येकी १ लक्ष १० हजार रुपये आणि नवीन महि

अंगणवाडी सेविका भरती 2023

इमेज
अकोला ग्रामिण साठी अंगणवाडी मदतनीस भरती प्रक्रिया अकोला, दि.३०(जिमाका)- एकत्मिक बालविकास सेवा योजना, प्रकल्प कार्यालय अकोला ग्रामिण अंतर्गत तालुक्यातील अंगणवाडी मदतनीस या मानधन तत्वावरील ४२ पदाची भरती राबविण्यात येत आहे. याबाबतचा जाहिरनामा बुधवारी (दि.२८जुन) जारी करण्यात आला असुन पात्र महिला उमेदवारांनी  दि.३ते १४ जुलै पर्यंत अर्ज करावे, असे आवाहन बालविकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बालविकास योजना अकोला ग्रामिण यांनी केले आहे.  या पदभरती प्रक्रियेत आपोती खुर्द ,मारोडी , म्हैसांग , मजलापुर , घुसरवाडी , दोनवाडा , एकलारा , लाखोंडा बु , दहिहांडा , धामणा , सांगवी खु , निराट , निभोंरा , आगर , लोणाग्रा , पाळोदी , टाकळी जलम , उगवा , मंडाळा , कापशीतलाव , लोणी , चांदुर , कुरणखेड ,पातुर नंदापुर ,टाकळी पोटे ,येळवण,   देवळी , पैलपाडा , कानशिवणी , बाभुळगांव , बोरगांव मंजु ,वाकी व वरोडी या गावांतील पदभरती शासन निर्णयानुसार करण्यात येत आहे. या करिता संबधित गावात दवंडी देण्यात येत आहे. त्या त्या गावातील इच्छुक व पात्र महिलांनी जास्तीत जास्त प्रमाणात अर्ज करावेत, असे कार्यालय  तर्फे कळविण्यात

एजंट न लावता डोमिसाईल सर्टिफिकेट’ कसं काढायचं? सविस्तर प्रोसेस कशी असेल ?

इमेज
राज्यातील रहिवासाचे प्रमाणपत्र म्हणून वय, राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्र (डोमेसाइल) देण्यात येते. पासपोर्टपासून इतर महत्त्वाच्या कामांसाठी हे डोमेसाइल प्रमाणपत्र आवश्यक असते. डोमिसाईल सर्टिफिकेट कुठे मिळते? पूर्वी राज्यातील कोर्टांमध्ये मिळणारे हे प्रमाणपत्र आता जिल्हाधिकाऱ्यांच्या सेतू कार्यालयात, तर सरकारतर्फे सुरू केलेल्या महा ई-सेवा केंद्रात ऑफलाइन आणि ऑनलाइन उपलब्ध करून दिले आहे. डोमेसाइल प्रमाणपत्र काढण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात असणाऱ्या सेतू कार्यालयात जाऊन यासाठी अर्ज करता येऊ शकतो. किंवा राज्य सरकारने ‘आपले सरकार’च्या महाऑनलाइनच्या  https://aaplesarkar.mahaonline.gov.in  माध्यमातून ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. डोमासाईल प्रमाणपत्रासाठी आवश्यक कागदपत्रे ओळखीचा पुराव पॅन कार्ड, पासपोर्ट, आधारकार्ड, मतदान कार्ड, रोजगार हमी योजना ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, फोटो, सरकारकडून देण्यात आलेले ओळखपत्र यापैकी एक कागदपत्रं पत्ता दर्शवणारा पुरावा पासपोर्ट, आधारकार्ड, मतदान कार्ड, रेशन कार्ड, पाणी बील, ड्रायव्हिंग लायसन्स, फोटो,

महाराष्ट्रात आम आदमी पार्टीची स्वराज्य यात्रा..सभेचे आयोजन इटालियांची प्रमुख उपस्थिती होत असून एडवोकेट मनीष दामोदर मोडक जिल्हाध्यक्ष वाशिम आम आदमी शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य यांनी केले.

इमेज
*स्वराज्य यात्रेतून 'आप'ची 'महाराष्ट्र' मोहीम* *'आप'च्या स्वराज्य यात्रेची पंढरपूरातून सुरुवात* आप'ची स्वराज्य यात्रा रविवारी टेम्भूर्णीत/सोलापुरात/28/5/2023 सभेचे आयोजन; इटालियांची प्रमुख उपस्थिती* गुजरात निवडणूकीनंतर राष्ट्रीय पक्षाची मान्यता मिळालेल्या आम आदमी पार्टीने आता महाराष्ट्रात लक्ष केंद्रित केले असून पक्षाची भूमिका गावोगावी घेऊन जाण्यासाठी स्वराज्य यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.  यात्रेची सुरुवात 28 मे रोजी पंढरपूर येथे विठ्ठल-रखुमाईच्या दर्शनाने होऊन 6 जून राज्याभिषेक दिनी रायगड येथे यात्रेची सांगता होणार आहे. स्वराज्य यात्रा सात जिल्ह्यातून जाणार असून या जिल्ह्यातील शहरे व गावांमध्ये सभा होणार आहेत. 782 किलोमीटरचा प्रवास ही यात्रा करेल. पक्षाचे राष्ट्रीय सह-सचिव व प्रदेश सह-प्रभारी युवा नेते गोपाल इटालिया ज्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाला गुजरातमध्ये 13 टक्के मतदान मिळवत आप ला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला, याच इटालिया यांच्या मार्गदर्शनात ही यात्रा होणार असल्याचे एडवोकेट मनीष दामोदर मोडक जिल्हाध्यक्ष वाशिम आम आदमी शेतकरी संघटना यां

शेतकऱ्यांसाठी ‘महाकृषी ऊर्जा अभियान....

इमेज
शेतकऱ्यांनी सौर कृषी पंपासाठी ‘पीएम कुसुम’ योजनेचा लाभ घ्यावा..  शेतकऱ्यांसाठी ‘महाकृषी ऊर्जा अभियान पीएम कुसुम घटक योजनेच्या पुढील टप्प्यांतर्गत सौर कृषी पंपाकरिता महाऊर्जेच्या ऑनलाईन पोर्टलवर अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.          शेतकऱ्यांनी पोर्टलवर अर्ज सादर करण्यासाठी त्यांच्या शेतजमीन क्षेत्रानुसार व इतर पात्रतेच्या अटीनसुार ३,५ व ७.५ एच.पी.(डी.सी) क्षमतेचे पारेषण विरहीत सौर कृषी पंप आस्थापित करण्यात येतात.          या योजनेंतर्गत शेतकरी लाभार्थी हिस्सा पुढीलप्रमाणे असणार आहे. खुला (१० टक्के) ३ एचपी १९३८०रू,५ एचपी २६,९७५ रू, ७.५ एचपी ३७,४४० रू, अनुसूचित जाती/अनुसूचित जमातीसाठी  ५ टक्के लाभार्थी हिस्सा भरावा लागेल. यात ३ एचपी ९,६९०,रू,  ५ एचपी १३,४८८ रू व ७.५ एचपी १८, ७२० रू आहे.  आवश्यक असलेली कागदपत्रे खालीलप्रमाणे आहेत  अर्ज ऑनलाईन सादर करताना त्यासोबत विहीर,कुपनलिका याची नोंद असलेला सातबारा,जमीन मालक एकापेक्षा जास्त असल्यास २०० रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर नाहरकत पत्र,आधरकार्ड,छायाचित्र, पासबूकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत जोडावी.           शेत