संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास मंडळाची कर्ज योजना.

संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास मंडळाची कर्ज योजना

लाभ घेण्याचे आवाहन

वाशिम,दि.२८(जिमाका)  संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळामार्फत अनुसूचित जाती प्रवर्गात येणाऱ्या चर्मकार समाजातील चांभार,ढोर,होलार व मोची यांच्याकरीता आर्थिक,शैक्षणिक व सामाजिक विकासासाठी विविध कर्ज योजना राबविल्या जातात. 
           सन २०२३-२४ या आर्थिक वर्षाकरीता राज्य शासनाच्या व केंद्र शासनाच्या एनएसएफडीसी योजना राबविण्यात येत आहे. ४ हजार ८०० लाभार्थ्यांना कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.
           एनएसएफडीसी,नवी दिल्ली यांच्या मुदती कर्ज योजनेअंतर्गत स्मॉल बिझनेससाठी १ लक्ष ते २ लक्ष रुपयापर्यंत,चर्मोद्योगासाठी २ लक्ष रुपये आणि लघुऋण वित्त योजना व महिला समृध्दी योजनेसाठी प्रत्येकी ५० हजार रुपये आहे. या योजनांसाठी मागील प्रलंबित नस्तीकरीता २२ कोटी २१ लक्ष रुपये निधी प्राप्त झाला आहे. 
          सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात एनएसएफडीसीच्या मुदती कर्ज योजनेअंतर्गत स्मॉल बिझनेससाठी ५ लक्ष रुपये, लघुऋण वित्त योजना व महिला समृद्धी योजनेसाठी प्रत्येकी १ लक्ष १० हजार रुपये आणि नवीन महिला अधिकारीता योजनेसाठी ५ लक्ष रुपये मंजूर आहे. एनएसएफडीसीच्या शैक्षणिक कर्ज योजनेमध्ये वाढ झाली आहे. देशात २० लक्ष रुपये आणि विदेशात ३० लक्ष रुपये कर्ज मंजूर करण्यात येणार आहे.तरी सर्व चर्मकार बांधवांनी या योजनेचा लाभ घ्यावा.अधिक माहितीसाठी महामंडळाच्या जिल्हा कार्यालयास भेट द्यावी.असे संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक धम्मज्योती गजभिये यांनी कळविले आहे.
*******

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

फूड व्यवसाय सुरू करण्यासाठी फूड लायसन्स हा एक महत्त्वाचा घटक आहे. फूड लायसन्स घेतल्यास ग्राहकांच्या आरोग्याचे रक्षण होते आणि फूड व्यवसायाच्या वाढीला चालना मिळते.

वाशिम कार्यालयास प्राप्त निधी मधून सम प्रमाणात सन 2022-23 मध्ये एकूण 1267 विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेचा लाभ देण्यात आला आहे.

एजंट न लावता डोमिसाईल सर्टिफिकेट’ कसं काढायचं? सविस्तर प्रोसेस कशी असेल ?