
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना ? काय आहे मिशन २०२५ महाराष्ट्रातील सुमारे ४५ लाख शेती वीज पंपांची संख्या ही देशात सर्वाधिक आहे. राज्यातील एकूण विजेच्या वापरापैकी २२ टक्के वीज वापर शेतीसाठी होतो. त्यामुळे शेतकरी बांधवांसाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना खूपच लाभदायी ठरणार आहे. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांची एक दिवसीय परिषद पार पाडण्यात आली. या परिषदेमध्ये मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 चे लोकार्पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या योजनेतून शेतकरी बांधवाना दिवसा वीज उपलब्ध करून देणे हा या योजनेचा उद्देश आहे. शेतकरी बांधवांसह उद्योजकांना देखील या योजनेचा लाभ मिळणार आहे. याद्वारे फक्त शेतीसाठी आणि एका राज्यात ७ हजार मेगावॅट पेक्षा जास्त सौर ऊर्जा निर्मिती करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. इतर अनेक क्षेत्राप्रमाणे शेती क्षेत्रही विजेच्या मागणीत देशभरात अग्रेसर असून शेतीला परवडणाऱ्या दरात वीज मिळावी यासाठी शासनाकडून दरवर्षी मोठ्या प्रमाणात अनुदान तर दिले जाते. याशिवाय वीज वितरण कंपनीच्या इतर ग्राहक...