अंगणवाडी सेविका भरती 2023
अकोला ग्रामिण साठी अंगणवाडी मदतनीस भरती प्रक्रिया अकोला, दि.३०(जिमाका)- एकत्मिक बालविकास सेवा योजना, प्रकल्प कार्यालय अकोला ग्रामिण अंतर्गत तालुक्यातील अंगणवाडी मदतनीस या मानधन तत्वावरील ४२ पदाची भरती राबविण्यात येत आहे. याबाबतचा जाहिरनामा बुधवारी (दि.२८जुन) जारी करण्यात आला असुन पात्र महिला उमेदवारांनी दि.३ते १४ जुलै पर्यंत अर्ज करावे, असे आवाहन बालविकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बालविकास योजना अकोला ग्रामिण यांनी केले आहे. या पदभरती प्रक्रियेत आपोती खुर्द ,मारोडी , म्हैसांग , मजलापुर , घुसरवाडी , दोनवाडा , एकलारा , लाखोंडा बु , दहिहांडा , धामणा , सांगवी खु , निराट , निभोंरा , आगर , लोणाग्रा , पाळोदी , टाकळी जलम , उगवा , मंडाळा , कापशीतलाव , लोणी , चांदुर , कुरणखेड ,पातुर नंदापुर ,टाकळी पोटे ,येळवण, देवळी , पैलपाडा , कानशिवणी , बाभुळगांव , बोरगांव मंजु ,वाकी व वरोडी या गावांतील पदभरती शासन निर्णयानुसार करण्यात येत आहे. या करिता संबधित गावात दवंडी देण्यात येत आहे. त्या त्या गावातील इच्छुक व पात्र महिलांनी जास्तीत जास्त प्रमाणात अर्ज करावेत, असे कार्या...