एजंट न लावता डोमिसाईल सर्टिफिकेट’ कसं काढायचं? सविस्तर प्रोसेस कशी असेल ?
राज्यातील रहिवासाचे प्रमाणपत्र म्हणून वय, राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्र (डोमेसाइल) देण्यात येते. पासपोर्टपासून इतर महत्त्वाच्या कामांसाठी हे डोमेसाइल प्रमाणपत्र आवश्यक असते. डोमिसाईल सर्टिफिकेट कुठे मिळते? पूर्वी राज्यातील कोर्टांमध्ये मिळणारे हे प्रमाणपत्र आता जिल्हाधिकाऱ्यांच्या सेतू कार्यालयात, तर सरकारतर्फे सुरू केलेल्या महा ई-सेवा केंद्रात ऑफलाइन आणि ऑनलाइन उपलब्ध करून दिले आहे. डोमेसाइल प्रमाणपत्र काढण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात असणाऱ्या सेतू कार्यालयात जाऊन यासाठी अर्ज करता येऊ शकतो. किंवा राज्य सरकारने ‘आपले सरकार’च्या महाऑनलाइनच्या https://aaplesarkar.mahaonline.gov.in माध्यमातून ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. डोमासाईल प्रमाणपत्रासाठी आवश्यक कागदपत्रे ओळखीचा पुराव पॅन कार्ड, पासपोर्ट, आधारकार्ड, मतदान कार्ड, रोजगार हमी योजना ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, फोटो, सरकारकडून देण्यात आलेले ओळखपत्र यापैकी एक कागदपत्रं पत्ता दर्शवणारा पुरावा पासपोर्ट, आधारकार्ड, मतदान कार्ड, रेशन कार्ड, पाणी बील, ड्रायव्हिंग लायसन्...